#Airtel Down: भारतात एअरटेल इंटरनेट, कॉलिंग सेवा ठप्प! जाणून घ्या कारण

151

गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जिओ युजर्स चांगलेच वैतागले होते. त्यानंतर आता टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलची मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा शुक्रवारी सकाळी अचानक ठप्प झाली. त्यामुळे एअरटेल युजर्सना मोबाईल कॉलिंग, मोबाईल वायरलेस आणि ब्रॉडबँड सेवेद्वारे इंटरनेट सेवा वापरण्यात मोठी अडचणी झाल्याने ते आक्रमक झाल्याने सोशल मिडीयावर एअरटेलविरोधात तक्रार करताना दिसेल. त्यामुळे सकाळपासून ट्विटरवर #Airtel Down हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.

(हेही वाचा – आघाडी सरकार आल्यापासून पेपर फुटीचे पेव, मनसेचा घाणाघात)

Downdetector च्या अहवालानुसार, Airtel ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा आज 11 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 9.50 वाजल्यापासून काम करत नाहीत. एअरटेलची सेवा सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संपूर्ण भारतात 11:18 पर्यंत 3,729 युजर्सनी त्यांच्या कनेक्शनमध्ये आउटेज झाल्याची तक्रार नोंदवली होती. अनेक युजर्सनी सांगितले की, या महिन्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे.

ट्विटर युजर्सच्या वतीने, मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर एअरटेल सेवा बंद झाल्याची माहिती सातत्याने दिली जात आहे. मात्र ही समस्या सुमारे 1 तास चालली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे एअरटेल ब्रॉडबँड, मोबाईल सेवा पुन्हा कामाला लागली आहे.

एअरटेलने व्यक्त केली दिलगीरी

एअरटेल ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा बंद केल्याप्रकरणी एअरटेलच्या वतीने ट्विटरवर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमच्या इंटरनेट सेवांमध्ये तात्पुरता व्यत्यय आला आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता सर्व सेवा सामान्य झाली आहे. एअरटेलची सेवा बराच काळ विस्कळीत झाली होती, याबाबत कंपनीकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.