अजय देवगण (Ajay Devgn) हा एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याचबरोबर तो दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. अजय देवगणने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत आणि चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. १९९१ मध्ये आलेल्या ’फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते आणि पहिल्याच चित्रपटाद्वारे तो एक स्टार झाला. या चित्रपटासाठी त्याला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला.
(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Movie : उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या दबावाला बळी पडू लागले?)
दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
त्याचबरोबर जिगर, विजयपथ, दिलवाले, जान, दिलजले या चित्रपटांमध्ये त्यांनी पुढील ॲक्शन भूमिका केल्या आणि इश्क, प्यार तो होना ही था, हम दिल दे चुके सनम मध्ये रोमँटिक भूमिका केल्या. त्याचबरोबर द लिजेंड ऑफ भगतसिंग मध्ये भगतसिंगच्या भूमिकेसाठी त्याला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कंपनी आणि ओंकारा या क्राइम थ्रिलरद्वारे त्याला अभिनेता म्हणून बहुमान मिळाला.
२०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार
पुढे अजय देवगणने रोहित शेट्टीसोबत मिळून अनेक हिट चित्रपट दिले. गोलमाल: फन अनलिमिटेड, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3, सिंघम, सिंघम रिटर्न्स असे अनेक ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपट या दोघांनी मिळून बनवले. तसेच गोलमाल अगेन, टोटल धमाल, तान्हाजी आणि दृश्यम या चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली. तान्हाजीमधील मुख्य भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये देवगणला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.
तो आहे विशाल विरु देवगण
अजय देवगणचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी पंजाबच्या अमृतसर येथील एका पंजाबी हिंदू कुटुंबात झाला. या कुटुंबाचा मुंबईतील हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंध आहे. अजय देवगणचे वडील वीरू देवगण हे स्टंट कोरिओग्राफर आणि ॲक्शन-फिल्म दिग्दर्शक होते आणि त्याची आई वीणा एक फिल्म प्रोड्यूसर आहे. त्याचा चुलत भाऊ अनिल देवगण हा चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहे. अजय देवगणचे खरे नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे ला? त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव विशाल विरु देवगण असे ठेवले. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना विशाल या नावाऐवजी अजय देवगण असे नामकरण करण्यात आले. आज अजय देवगण अभिनयाच्या बाबतीत खरोखरच अजय आहे. (Ajay Devgn)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community