Ajit Doval : भारताचे जेम्स बॉंड अजित डोवाल

Ajit Doval : कॉंग्रेसच्या काळात असले कुचकामी धोरण बदलून अजित डोवाल यांनी राष्ट्रीय भावना असलेले धोरण राबवले. आज भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाचीही नाही.

187
Ajit Doval : भारताचे जेम्स बॉंड अजित डोवाल
Ajit Doval : भारताचे जेम्स बॉंड अजित डोवाल

अजित कुमार डोवाल (Ajit Doval) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए, NSA) आहेत. ते केरळ कॅडरचे इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) प्रमुख आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी होते. त्यांचा जन्म २० जानेवारी १९४५ रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील घिरी बनेलस्यून गावात झाला.

(हेही वाचा – EPFO-Aadhaar Card : EPFO ने जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड ओळखपत्र हटवलं)

१९६८ मध्ये केरळ कॅडरमध्ये नियुक्ती

त्यांचे वडील मेजर जी एन डोवाल हे लष्करी अधिकारी होते आणि त्यांची आई शकुंतला डोवाल गृहिणी होत्या. अजित डोवाल यांचे माध्यमिक शिक्षण अजमेर येथील मिलिटरी स्कूल येथे झाले. १९६७ मध्ये त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली. १९६८ मध्ये केरळ कॅडरमध्ये ते आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यांनी पोलिस सेवेत सुमारे २ वर्षे काम केले आणि १९७२ मध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ते भारतीय गुप्तचर यंत्रणेत (Indian Intelligence Service) काम करु लागले.

पाकिस्तानमध्ये ७ वर्षे हेरगिरी 

त्यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे पाकिस्तानमध्ये त्यांनी तब्बल ७ वर्षे त्यांनी हेरगिरी केली. भारतीय सैन्याला पाकिस्तानातील गुप्त माहिती पुरवली. या कामादरम्यान ते मुसलमान बनून वावरत होते. अंडरकव्हर काम करत दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला पुरवली. त्यांनी १५ वेळा भारतीय विमान अपहरणाचा (Indian plane hijacking) कट उधळून लावला.

(हेही वाचा – Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचे जरांगे पाटलांना आवाहन; म्हणाले कायदेशीर लढा उभा करायचा असेल, तर…)

अजित डोवाल यांची कामगिरी

निवृत्त झाल्यानंतर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अजित डोवाल यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. अजित डोवाल यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण पूर्णपणे बदलून टाकले. कॉंग्रेसच्या काळात असले कुचकामी धोरण बदलून त्यांनी राष्ट्रीय भावना असलेले धोरण राबवले. आज भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत कोणाचीही नाही. यात अजित डोवाल यांचा सिंहाचा वाटा आहे. (Ajit Doval)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.