अजित पवारांचा एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम! ही शेवटची संधी अन्यथा…

109

राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश राज्य सरकारला दिले होते. यानंतर आता अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा, ही शेवटची संधी असून, गैरहजर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. असे पवारांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा

राज्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हा असं आवाहन अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली असून पगार वेळेत दिला जाईल असं आश्वासनही अजित पवारांनी दिलं आहे. ३१ मार्चपर्यंत कोणाचेही न ऐकता, आत्महत्येता विचार न करता एसटीत रूजू व्हा आणि आपले काम सुरू करा अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, वेगळी संधी मिळणार नाही अशा इशारा अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

( हेही वाचा : माहिममध्ये बस स्टॉपच बनले डम्पिंग ग्राऊंड? )

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८ टक्के करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ टक्के, १४ टक्के, २१ टक्के वरुन ८ टक्के, १६ टक्के आणि २४ टक्के टक्के करण्यात आला, तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवा कालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने ग्वाही घेतली आहे. संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना २५०० ते ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. हे कामगार वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका, असेही परिवहन मंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.