थट्टा कॅम्प : कसाबला दिलेल्या ट्रेनिंग सेंटरमध्येच तयार झाला झिशान, ओसामा! 

थट्टा कॅम्प येथे नर्सरीसारखे काम चालते, कमी वयातच मुलांना या ठिकाणी जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

93

अजमल कसाबचे पाकिस्तानमधील ट्रेनिंग सेंटर ‘थट्टा कॅम्प’ या ठिकाणी झिशान आणि ओसामा या दोघांना प्रशिक्षण देण्यात आले होते. ट्रेनिंग देणारे पाकिस्तान आर्मीचे अधिकारी होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धक्कादायक खुलाशानंतर पाकिस्तानचा आतंकी चेहरा जगाच्या समोर पुन्हा एकदा आला आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील थट्टा कॅम्प हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या कराचीमध्ये थट्टा कॅम्प हे प्रशिक्षण केंद्र आहे. या थट्टा कॅम्पवर अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण देणारे पाकिस्तान आर्मीचे अधिकारीच होते.

थट्टा कॅम्प या ठिकाणी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले!

पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तचर यंत्रणेने पुन्हा एकदा भारतातील प्रमुख शहरावर हल्ले करण्याची योजना आखली होती. आयएसआय या गुप्तचर संघटनेने भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानात लपून बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याची मदत घेतली होती. या हल्ल्यासाठी तयार करण्यात आलेल्या ६ आतंकवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून नुकतीच अटक केली आहे. या आतंकवाद्यांपैकी झिशान आणि ओसामा या आतंकवाद्यांना पाकिस्तानातील थट्टा कॅम्प या ठिकाणी १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यात एके ४७ रायफल चालवणे, हॅन्ड ग्रेनेड फेकणे, स्फोटके तयार करणे, गन चालवणे इत्यादी प्रकारचे  प्रशिक्षण देण्यात आले. पाकिस्तानच्या सिंध प्रातांत असलेल्या कराची येथील थट्टा कॅम्प या ठिकाणी झिशान आणि ओसामा या दोघांना पाकिस्तानच्या आर्मी अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिल्याचे दोघांच्या चौकशीत समोर आले आहे. पाकिस्तानच्या ‘थट्टा कॅम्प’ या प्रशिक्षण केंद्राचे नाव दुसऱ्यांदा भारताच्या समोर आले आहे, आधी २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी आणि आता दुसऱ्यांदा समोर आले आहे.

(हेही वाचा : मुंबईत पोलिस यंत्रणेची रॅपिड अ‍ॅक्शन! मुंबईला धोका वाढला?)

थट्टा कॅम्प पाकिस्तानातील सर्वात सुरक्षित ठिकाण!

‘थट्टा कॅम्प’ हे सिंध प्रातांतील कराची येथे असून या ठिकाणीच मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांना पाकच्या आर्मी अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिले होते. अजमल कसाबच्या चौकशीत थट्टा कॅम्प नाव समोर आले होते. थट्टा कॅम्प हे पाकिस्तानमधील सुरक्षित ठिकाण असून त्याच ठिकाणी आयएसआयचे सुरक्षित ठिकाण आहे, ज्या ठिकाणी दहशतवादी तयार केले जात आहेत. थट्टा कॅम्प येथे नर्सरीसारखे काम चालते, कमी वयातच मुलांना या ठिकाणी जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण देऊन दहशतवादी बनवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १५० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता, त्यात परदेशी नागरिक, मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि एनएसजी कमांडोंचा समावेश होता. १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता, त्यात ९ दहशतवादी मारले गेले होते. अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले होते. अजमल कसाबच्या चौकशीत पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला होता. तसेच पाकिस्तानमधील थट्टा कॅम्प या प्रशिक्षण केंद्राच्या सेंटरचे नाव समोर आले होते. अजमल कसाब याला अखेर फासावर लटकवण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.