मंदिराच्या सभामंडपावर झाड कोसळून मोठी दुर्घटना! ७ भाविकांचा मृत्यू; ५ गंभीर, ४० जखमी

170

अकोला जिल्ह्यातील पारसगावात लिंबाचे झाड मंदिराच्या सभामंडपावर कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. कोसळलेल्या झाडाखाली दबून ७ भाविकांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर, तर ४० जण जखणी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री ९ च्या सुमारास मंदिरात ५० ते ६० भाविक होते. यावेळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता, तेव्हाच ही दुर्घटना घडली. पाऊस रात्रभर सुरू असल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते.

( हेही वाचा : रामनवमीच्या दिवशी भाषण केल्याप्रकरणी काजल हिंदुस्तानी यांना अटक )

जखमींना केले रुग्णालयात दाखल 

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यासोबत ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा घटनास्थळी आल्या. यावेळी ५० ते ६० जण मंदिराच्या शेडखाली होते. आतापर्यंत या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून आताही बचाव कार्य सुरू आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अवकाळी पाऊस सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.