पॅसेंजर रेल्वे आणि भाजप खासदाराचे घर बाॅम्बने उडवण्याची धमकी; पोलीस दलात खळबळ

126

अकोला – पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे ( Akola Purna passenger) अकोल्याचे भाजपचे खासदार ( BJP MP Sanjay Dhotre) संजय धोत्रे यांचे घर बाॅम्बने उडवण्याची धमकी आल्याची माहिती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने अकोला पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी मंगळवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. सोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी केली, तसेच खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला.

26 जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला- पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वेत बाॅम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बाॅम्बने उडवून देणार असल्याचे धमकीचे काॅल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बाॅम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. त्यानंतर अकोला पोलिसांनी पॅसेंजरची तपासणी केली. तपासणीनंतर अर्धा तास शोध मोहिम राबवण्यात आली.

फसवणुकीसाठी फोन आल्याची शक्यता

यादरम्यान, रेल्वेची संपूर्ण तपासणी केल्यानंतर, कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. यादरम्यान, धमकी देण्यात आलेला फोन फसवणूक करण्यासाठी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( हेही वाचा: बाळासाहेबांच्या सूनेने घेतली एकनाथ शिंदेंची भेट )

तपास सुरु 

अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे घरंही बाॅम्बने उडवून देण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराशेजारील परिसराची तपासणी झाली. रात्री त्यांच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसेच, रेल्वे पोलिसांनीही खासदारांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. बाॅम्बने उडवून देणा-या धमक्या कोणी आणि कुठून दिल्या, याचा तपासही पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.