एसटी कर्मचारी गेल्या 90 दिवसांपासून संपात सहभागी आहे. गेल्या 90 दिवसांपासून त्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनापासून भीक मांगो आंदोलन करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरला आहे.
म्हणून आंदोलनाचा निर्धार
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी गेल्या नऊ दिवसांपासून संप करीत आहेत. या संपामुळे कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यासोबतच या संपामुळे महामंडळाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी या कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे.
( हेही वाचा: सेवानिवृत्त झालेल्या आयएनएस खुकरी जहाजाचा ‘असाही’ पुनर्वापर ! )
संप मिटेपर्यंत आंदोलन
आगार क्रमांक एक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी टावर चौक तसेच फते चौकामध्ये भीक मांगो आंदोलन केले. यामधून जमा झालेली रक्कम हे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना पाठवणार आहे. त्यासोबतच काही रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी वापरणार असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच वेतन नसल्यामुळे, कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे बुधवारपासून भीक मांगो आंदोलन हे संप मिटेपर्यंत सुरूच राहणार असल्याचा, निर्धार कर्मचा-यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community