बापरे! देवगडच्या समुद्रावर विचित्र आकाराची सुरमई

152

देवगडच्या खोल समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या अक्षय हेरम या तरुण मच्छिमाराला एक वेगळीच सुरमई हाती आली. बुधवारी प्रजासत्ताक दिनी दुपारी सुरमई तोंड आणि शेपटीकडून शरीराच्या खालच्या बाजूने पट्टीसारखी सरळ आढळली. हा प्रकार समद्रातील माशांमध्ये भारतीय समुद्रकिना-यावर पहिल्यांदाच आढळून आली. वाढत्या जलप्रदूषणामुळेही माशांच्या आकारात बदल होत असल्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

वडिलोपार्जित मासेमारीचा व्यवसाय असलेल्या अक्षय हेरम यांनी बुधवारी देवगड आणि मालवडसमद्रादरम्यान खोल समुद्रातील मासेमारीसाठी गेले होते. जाळ्यात पंचवीस सुरमई अडकल्यानंतर जाळी बोटीवर सोडली गेली. त्यावेळी एका सुरमईचा आकार विचित्र आढळून आला. सुरमईच्या तोंड आणि शेपटीपर्यंत खालचा भाग समान पट्टीसारखा आढळल्यानंतर त्यांनी या माशाचा फोटो काढला. हा मासा खाण्यासाठी योग्य असला तरीही समद्रातील गडबड आता माशांच्या आकारमानात बदल घडवून आणत असल्याची माहिती समुद्री जीवशास्त्रतज्ञ स्वप्नील तांडेल यांनी केला. शरीरातील सांगाड्यात दिसून आलेला हा प्रकार हा सांगाड्यातील विकृती असा संबोधला जातो. शास्त्रीय भाषेत या विकृतीला किफोसीस लोर्डोसिस असे संबोधले जाते.

(हेही वाचा – वडाळ्यात शिवसेना विरुद्ध कोळंबकर यांच्यातच होणार लढत)

ही घटना दुर्मिळ

खोल समद्रातील माशांमध्ये सांगाड्याची विकृती आढळत नाही. मत्स्य शेतीच्या माध्यमातून उपलब्ध माशांमध्ये अशा पद्धतीची सांगाड्याची विकृती आढळते. मत्स्य शेतीमध्ये जागेच्या कमतरतेमुळे माशांच्या विकसनशीलतेवर परिणाम होतो. खोल समद्रात भारतीय सागरी जीवनात हा प्रकार पहिल्यांदाच आढळून आला आहे, असे सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्नील तांडेल यांनी सांगितले.

माशाच्या सांगाड्यात विकृती आढळण्यामागे कारणे 

० वाढते जलप्रदूषण
० अनुवांशिकता
० समुद्रातील पाण्याचे वाढते तापमान
० माश्यातील शरीरात आवश्यक पोषणांची कमतरता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.