अमेरिकेने केला एअर स्ट्राईक! सोमालियात अल शबाबचे ३० दहशतवादी ठार

212

अमेरिकन सैन्याने सोमालियातील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. अमेरिकन सैन्याने केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात अमेरिकन सैन्याला यश आले आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी सोमालिया शहरातील अल शबाब दहशतवादी संघटनेला लक्ष्य करत एअर स्ट्राईक केला. अमेरिका दहशतवाद्यांशी लढण्यात सोमालिया सरकारला मदत करत आहे.

( हेही वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करा, हिंदू समाजावर होणारा अन्याय आता सहन करणार नाही! पुण्यात मोर्चाला सुरूवात )

अल शबाबचे ३० दहशतवादी ठार

सोमालिया हा पूर्व आफ्रिकेतील देश असून याठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू असतात. अमेरिकन सैन्याने २० जानेवारी रोजी सोमालियामध्ये ३० इस्लामिक अल शबाबच्या दहशतवाद्यांना ठार केले. अमेरिकन-आफ्रिकन कमांडने ही माहिती दिली आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून २६० किमी उत्तर-पूर्वेला गलकाडजवळ ही कारवाई करण्यात आली. अमेरिकन सैन्य आणि सोमालिया नॅशनल लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात हे दहशतवादी मारले गेले. अल शबाब ही दहशतवादी संघटना अल कायदाचा भाग आहे.

सोमालियामध्ये कार्यरत असलेली ही दहशतवादी संघटना संपूर्ण पूर्व आफ्रिकेच्या सुरक्षेसाठी धोका आहे. असे अमेरिकन सैन्याने २१ जानेवारीला स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.