दारुसाठी ‘त्यांनी’ केली जबर मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील मांजरी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. उधारीवर दारू मागितली आणि दारू विक्रेत्याने देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या टोळक्याने दारू विक्रेत्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

असा घडला प्रकार

पुण्यातील मांजरी येथे एका मद्यपीने उधारीवर दारू मागितल्याने विक्रेत्याने देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या टोळक्याने विक्रेत्याला जबर मारहाण केली आहे. दारू विक्रेत्याला टोळक्याने चक्क दगडाने मारहाण केली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – सरकारची 31st ला बंपर ऑफर! अवघ्या पाच रुपयांत व्हा टल्ली…)

पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन केलं अटक

याप्रकरणी दुकानदार साईराज सुधीर हिंगणे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी संतोष घुले आणि ओमकार घाडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here