अलर्ट…पवईसह धारावीत १०० टक्के पाणीकपात!

मंगळवारी, २३ मार्चपासून १२ तासांच्या कालावधीत एस विभागातील पवई आणि जी उत्तर विभागातील धारावी आदी भागांमध्ये शंभर टक्के पाणीकपात राहणार आहे. तर महापालिकेच्या के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर या विभागांमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

102

पवईतील अँकर ब्लॉक येथे तानसा पूर्व सागरी व ९०० मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीची झडप तसेच पवई उच्चस्तरीय जलाशय १ यांच्या इनलेटच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी २३ मार्च रोजी हाती घेण्यात येणार आहे. हे काम मंगळवारी सकाळी दहा वाजता हाती घेण्यात येणार असून रात्री दहा वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे १२ तासांच्या या कालावधीमध्ये एस विभागातील पवई आणि जी उत्तर विभागातील धारावी आदी भागांमध्ये शंभर टक्के पाणीकपात राहणार आहे. तर महापालिकेच्या के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर या विभागांमध्ये कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे या सर्व भागांमधील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जलअभियंता व उपायुक्त अजय राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्या भागांमध्ये कशाप्रकारे असणार पाणीकपात?

एस विभाग : जयभीम नगर, बेस्ट नगर, आरे रोड आणि परिसर तसेच फिल्टर पाडा

पाणीपुरवठा : १०० टक्के पाणीकपात

के पूर्व विभाग : चकाला, प्रकाशवाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजीनगर, शहीद भगतसिंह वसाहत, चरतसिंग वसाहत, मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर,, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, साग बाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर रोड, जे. बी.नगर, बगरखा रोड, क्रांती नगर, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी अँड टी कॉलनी, विजय नगर, मिलिटरी मार्ग, वसंत ओएसिस, टाकपाडा, गावदेवी, मरोळगाव, चर्च मार्ग, हिल व्हिव सोसायटी, कदमवाडी, मूळगाव डोंगरी,एमआयडीसी रोड क्रमांक १ ते २३, यशवंत नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, डी.पी. रोड, महाकाली नगर, बामण दयापाडा, इन्कम टॅक्स कॉलनी, सिप्झ, आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर’

(हेही वाचा : धक्कादायक! दादर फुल मंडईत ६ हमाल, नोकर पॉझिटिव्ह!)

पाणी पुरवठा : कमी दबाने होणार पुरवठा

एच पूर्व विभाग : वांद्रे टर्मिनस पुरवठा क्षेत्र

पाणी पुरवठा : कमी दाबाने होणार पुरवठा

जी उत्तर विभाग : प्रेम नगर, नाईक नगर, धारावी लूप रोड

पाणी पुरवठा : कमी दाबाने होणार पुरवठा

जी उत्तर विभाग : धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, ए.के.जी नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग

पाणीपुरवठा : १०० टक्के पाणीकपात

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.