सर्व सरकारी वाहन इलेक्ट्रिकच असतील! आदित्य ठाकरेंची घोषणा

राज्यात पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा निर्णय आहे. यानुसार २०१९ मध्ये राज्याने नवीन औद्योगिक धोरण तयार केले आहे. नववर्षाच्या सुरुवातीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिकच असणार आहेत. अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल२०२२ पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी १ जानेवारी २०२२ पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा : सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून सेनेला मुंबई‘करां’ची आठवण झाली, शेलारांचा टोला )

मंत्र्यांचे आभार

१ जानेवारी २०२२ पासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन

मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या वतीने एकूण ३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामध्ये हुतात्मा चौक सशुल्क वाहनतळ, काळाघोडा चौकातील सशुल्क वाहनतळ आणि राम्पार्ट मार्ग पदपथ सशुल्क वाहनतळ या ३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या तीनही ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या ३ महिन्यांसाठी विनामूल्य इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here