वीर सावरकर आयएएस स्टडी सर्कलच्या सहकार्याने ऑनलाइन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

91

स्वातंत्र्यवीर सावरकर IAS स्टडी सर्कलच्या सहकार्याने राष्ट्रकूट मासिकाच्या वर्धापनदिनानिमित्त अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा -2022 ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा तीन टप्प्यात झाली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतभरातून 943 स्पर्धकांनी आपली नावे नोंदवली होती, मात्र एकट्या जम्मू-काश्मीरमधील एकाही विद्यार्थ्याने या स्पर्धेत भाग घेतला नाही.

(हेही वाचा – ‘मनसे विद्यार्थी सेने’ला मिळाले नवे ‘गुरुजी’! मराठी भाषा गौरव दिनी पक्षाचा मोठा निर्णय)

यांनी पटकावला क्रमांक

राष्ट्रकूट संघाचे प्रा. महेश कुलकर्णी, डॉ.नंदकुमार मोघे, अनिल वेलणकर, प्रताप नायर, राजन देसाई, राहुल येल्लापूरकर, शिल्पा परब-प्रधान, राहुल भांडारकर यांनी मोलाचे सहकार्य केले. महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाच्या दिवशी ऑनलाईन परीक्षेचा शेवटचा टप्पा घेण्यात आला. या परीक्षेत रितेश महापात्रा याने प्रथम, गौरी देवरे यांनी द्वितीय तर मयूर यादव याने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा परीक्षेच्या आयोजनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे व सह कार्यवाह स्वप्नील सावरकर यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.

देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा

UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने निवडलेल्या उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPAS), भारतीय महसूल सेवा (IRS) आणि भारतीय विदेश सेवा (IFS) इत्यादींमध्ये भरती केली जाते. ही परीक्षा विविध क्षेत्रातील अ आणि स्तर ब अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी घेतली जाते. UPSC दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते. ही स्पर्धा देशातील सर्वात कठीण मानली जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.