राज्यात १ डिसेंबरपासून शाळेत सुरू होणार मुलांचा किलबिलाट!

राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. राज्यभरातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय येण्यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भातील संकेत दिले होते. या निर्णयानुसार पहिले ते सातवीचे वर्ग १ डिसेंबरपासून नियमित सुरू होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते ४ थी व शहरी भागात इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यभरात १ डिसेंबरपासून पहिले ते बारावीपर्यंत सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे सुरक्षित वातावरण विद्यार्थ्यांना मिळावं याची जबाबदारी शालेय शिक्षकांवर असणार आहे. असे असले तरी आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्याची की नाही, हा निर्णय पालकांचा असणार आहे.

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे राज्यातील विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – शक्ती मिल बलात्कार प्रकरण : आरोपींना जन्मठेप, फाशी रद्द!)

काय म्हणाल्यात शिक्षणमंत्री…

दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत, राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली आहे, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रात पहिलीपासून बारावीपर्यंतचे वर्ग नियमित सुरू होणार असून त्यांना सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याची हमी वर्षा गायकवाड यांनी यावेळी पालकांनी दिली.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here