देशविरोधी कट रचल्याचा आरोप;औरंगाबादमधून पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांना अटक

105

मागच्या काही दशकांपासून सिमी, आयसिस या दहशतवादी संघटना आणि आता पीएफआयसारख्या कट्टरपंथीय संघटनेवर झालेल्या कारवाईमुळे औरंगाबाद चर्चेत आलं आहे. गुरुवारी एनआयए आणि ईडीच्या पथकाने केलेल्या कारवाईत मराठवाड्यातील 10 जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यात औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांवर एटीएसने छापेमारी करत अटक केली. या कारवाईत औरंगाबादमधून चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ज्यात पीएफआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख नासेरचासुद्धा समावेश आहे. सोबतच जालना येथून एक आणि नांदेड भागातून 5 पीएफआयच्या पदाधिका-यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मात्र गंभीर आहेत. कलम 121A म्हणजेच देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, कलम 153A म्हणजेच जात,धर्म समुहात तेढ निर्माण करणे, कलम 109 म्हणजेच एखाद्या गुन्ह्याला मदत करणे, कलम13 (1) बी म्हणजेच प्रतिबंधित कृर्त्य करणे, कलन 120B म्हणजेच कट रचणे, असे आरोप पीएफआयच्या पदाधिका-यांवर ठेवण्यात आले आहेत.

( हेही वाचा: संभाजीनगरचा तीढा सुटला, दसऱ्याच्या मुहुर्तावर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.