मुंबईहून भूजला जाणाऱ्या अलायन्स एअरच्या एटीआर-72 विमानाने बुधवारी सकाळी मुंबईहून टेक ऑफ केले. मात्र त्या दरम्यान इंजिनवरील कव्हर धावपट्टीवर पडले. उड्डाणानंतर काही वेळाने याची माहिती मिळाल्यावर ते विमान तातडीने भुजमध्ये सुरक्षित उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंजिनचे वरचे कव्हर कसे पडले याची चौकशी सुरू केली आहे.
चार क्रू मेंबर, अभियंत्यासह ७० लोक होते
मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअर मुंबईहून भुजला उड्डाण केले. ते उड्डाण केल्यावर काही वेळातच ही घटना घडली. मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) विभागाला ही बाब लक्षात आली. यावेळी विमानात चार क्रू मेंबर आणि देखभाल अभियंत्यासह ७० लोक होते.
एअर लाइन्स विरोधात चौकशी सुरू
नागरी विमान वाहतूक महासंचालक विभागाच्या (डीजीसीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमान भुज विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि एअर लाइन्स विरोधात चौकशी सुरू झाली आहे. सदर घटना कशी घडली याची चौकशी विमान वाहतूक क्षेत्राचे पर्यवेक्षक करत आहेत. या घटनेचे कारण खराब देखभाल असू शकते. जर कुंडी सुरक्षित नसेल तर सामान्यतः देखभाल कामानंतर काऊल डिटेचमेंट होते. उड्डाण सुरू होण्यापूर्वी चालक दलाने हे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे की, इंजिन काउल नीट आहे की नाही, असे तज्ज्ञांच्या मत आहे.
Join Our WhatsApp Community