ज्ञाननापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून जिल्हा न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना, या प्रकरणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केला आहे. तर हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकरांचे म्हणणे आहे. सध्या या जागेत कोणीही जाऊ नये आणि ही जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, आता सापडलेल्या शिवलिंगाची पूजा दररोज व्हावी आणि तिथे पूजेला परवानगी देण्याची विनंती महंतांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात याचिका वाराणसी जिल्हा न्यायालयात सोमवारी दाखल करण्यात येणार असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – SBI ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘हा’ मेसेज त्वरीत डिलीट करा; अन्यथा…)
सोमवारी याचिका दाखल होणार
ज्ञानवापी मशिदीत जे शिवलिंग सापडले आहेत, त्याची नियमित पूजा होणे गरजेचे आहे. या शिवलिंगाच्या पुजेला परवानगी मिळावी, यासाठी २३ मे रोजी सोमवारी याचिका दाखल करणार असल्याचेही काशी विश्वेश्वर मंदिराचे माजी महंत डॉ. कुलदीप तिवारी यांनी सांगितले. इतक्या मोठ्या कालावधीनंतर जर बाबा भोलेनाथ सापडले असतील तर त्यांची दररोज पूजा अर्चना होणे गरजेचे आहे, असे झाले नाही तर शिवभक्तांना दुःख होईल, असेही ते म्हणाले.
काय होणार याचिकेवर निर्णय…
दरम्यान, भोलेबाबांच्या श्रृंगार, नैवेद्य, अभिषेक, स्वच्छता, पूजापाठ कऱण्याचे अधिकार मिळावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता ही याचिका जिल्हा न्यायालय स्वीकारणार की नाकारण्यात येणार, यावर कोणता निर्णय होणार हे सोमवारी पाहावे लागेल.
Join Our WhatsApp Community