‘त्या’ रेव्ह पार्टीतून महाविकास आघाडीतील बड्या नेत्याचा मुलगा पळाला! 

या कारवाईनंतर मीडियाचा संपूर्ण फोकस आर्यनवर आहे. परंतु जर या बड्या राजकीय नेत्याच्या मुलाला अटक झाली असती, तर चर्चेचा फोकस निश्चित वेगळा असता.

सध्या मुंबईत सगळीकडे चर्चा सुरु आहे ती कॉर्डेलिया क्रुझवर झालेल्या रेव्ह पार्टीची.. या पार्टीत बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच्या मुलाला अटक झाली आणि खऱ्या अर्थाने या कारवाईला हाय प्रोफाईल रुप आले. आर्यन खान याच्यासह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेत अटक केली आहे. मात्र आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पार्टीत महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याचा मुलगाही सहभागी झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. पुण्यातील बड्या नेत्याचा हा मुलगा असून, परिवारातील वादामुळे देखील तो काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता.

अन् तो तिथून निसटला!

क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीत आर्यन खान याच्यासह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंह, मोहक जैस्वाल, गोमीत चोप्रा, नुपूर सारीका आणि विक्रांत चौकर यांना अटक करण्यात आली. मात्र एनसीबीच्या पथकाच्या कारवाई दरम्यान बड्या नेत्याचा तो मुलगा मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

(हेही वाचा : आर्यन खानच्या एनसीबीच्या कोठडीतील मुक्काम वाढला!)

बड्या नेत्याचा तो मुलगा कोण?

महाविकास आघाडीतील बड्या नेत्याचा हा मुलगा जरी पळून जाण्यात यशस्वी ठरला असला तरी गेल्या काही महिन्यांपूर्वी हा चर्चेत देखील आला होता. या तरुणाच्या मोठ्या भावाने अलिकडेच राजकारणात पदार्पण केले असून, परिवारातील वादामुळे देखील तो चर्चेत आला होता. दरम्यान शाहरुखचा मुलगा आर्यन हा या कारवाईमुळे चर्चेत आला आहे. आर्यनच्या अटकेनंतर किंग खानचा जुना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आर्यनने ड्रग्ज, सेक्स सर्व काही करावे, असे शाहरुख म्हणाला. या कारवाईनंतर मीडियाचा संपूर्ण फोकस आर्यनवर आहे. परंतु जर या बड्या राजकीय नेत्याच्या मुलाला अटक झाली असती, तर चर्चेचा फोकस निश्चित वेगळा असता. दरम्यान क्रूझवर ताब्यात घेतलेला तरुण या ड्रग्ज प्रकरणात सामील होता की नाही, याबाबत उलगडा झाला नाही. परंतु हा तरुण त्या क्रूझवर होता हे मात्र निश्चित. तो निसटण्यात कसा यशस्वी झाला हेही एक मोठे कोडे आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

दरम्यान शाहरूख खान याच्या मुलावर झालेल्या कारवाई बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी ‘मुलगा कुणाचाही असो, कारवाई झालीच पाहिजे. कायद्यासमोर सगळे सारखे असल्याची प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here