गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचा-यांची कपात केली आहे. राॅयटर्सने या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. जगभरातील सहा टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. मायक्रोसाॅफ्ट कंपनीने आपल्या दहा हजार कर्मचा-यांना काढून टाकले होते. त्यानंतर आता अल्फाबेट कंपनीनेही 12 हजार कर्मचा-यांना नारळ दिला आहे.
( हेही वाचा: अनेक सरकारी बॅंकांसाठी महत्त्वाची घोषणा; तुमचेही खाते असेल तर जाणून घ्या सविस्तर )
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचा-यांना ईमेलवरुन सांगितले की, आम्ही येथे घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत आहोत. कंपनीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. एकूण खर्चाचे नियोजन आणि पुढील तयारीसाठी हा निर्णय घेतला आहे, असे पिचाई यांनी सांगितले. नोकरीवरुन काढलेल्या सर्व कर्मचा-यांना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल, असेही पिचाई यांनी सांगितले.
( हेही वाचा: ICC ऑनलाईन फ्राॅडचा बळी; काही मिनिटांमध्ये लागला कोटींचा चुना )