वर्ष उलटले तरी राज्याला पूर्णकालिक पोलीस महासंचालक मिळेना…

महाराष्ट्र सारख्या राज्याच्या पोलीस महासंचालकाचे पद हे मागील 1 वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पोलीस महासंचालक कार्यालयाने दिली आहे. मागील 1 वर्षांपासून पूर्णकालिक महासंचालकाची नेमणूक न झाल्याने सद्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांस अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पोलीस महासंचालक हे पद 2021 पासून रिक्त

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पोलीस महासंचालक कार्यालयाकडे महासंचालकाचे रिक्त पद पदाबाबत माहिती मागितली होती. पोलीस महासंचालकाचे वरिष्ठ कार्यासन अधिकारी श्रीकांत पाटील यांनी अनिल गलगली यांस कळविले की पोलीस महासंचालक हे पद 1 जानेवारी 2021 पासून रिक्त आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांस 10 एप्रिल 2021 अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. पोलीस महासंचालक पदासाठी सेवाज्येष्ठतेची यादी तसेच प्रस्तावाचीमाहिती त्यांच्या महासंचालक कार्यालयात संबंधित नसल्याचे सांगितले. अनिल गलगली यांचा अर्ज गृह विभागाकडे हस्तांतरित केला.

(हेही वाचा – ED चा नवा पत्ता ऐकला का? अंडरवर्ल्ड दाऊदचा हस्तक ड्रग्ज तस्करच्या जागेत नवं कार्यालय)

हे राज्यासाठी भूषणावह नाही

अनिल गलगली यांनी याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की महासंचालक पद हे महत्वाचे असून तत्काळ नेमणूक होणे गरजेचे आहे. अश्या पदाचा कार्यभार दिले जाणे हे महाराष्ट्र सारख्या प्रगतशील राज्यासाठी भूषणावह नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here