उमेश कोल्हे हत्या प्रकरण: आरोपीची माहिती देणाऱ्याला NIA कडून 2 लाखांचे बक्षीस

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील फरार आरोपी शमीम अहमद उर्फ फिरोज अहमद याच्याविरुद्ध एनआयएने दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. शमीमची माहिती देणा-याला 2 लाख रुपये दिले जातील असे NIA कडून सांगण्यात आले आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात 22 जून रोजी उमेश कोल्हे यांची त्याच्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपी शमीम अहमदचाही पोलीस शोध घेत आहेत. यापूर्वी एनआयएने मुदस्सर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद आणि डाॅक्टर युसूफ खान बहादूर खान यांच्यासह सात आरोपींना ताब्यात घेतले होते. या हत्येमागे कथित मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम होता.

( हेही वाचा: गुजरातमध्ये केजरीवालांची रिक्षात बसून नौटंकी )

नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून हत्या….

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणा-या सोशल मीडिया पोस्ट आणि उमेश कोल्हे यांच्या हत्येचा संबंध असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here