Amarnath Cloudburst: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे 15 भाविकांचा मृत्यू; 40 बेपत्ता

132

अमरनाथ पवित्र गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी होऊन मोठी हानी झाली. या घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 15जणांचे मृतदेह हाती आले आहेत तर 40 भाविक बेपत्ता आहेत. या ढगफुटीमुळे अमरनाथ यात्रेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून सुरुवात झाली. यादरम्यान शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही ढगफुटी झाली. या गुहेजवळ सध्या 10 ते 12 हजार भाविक असल्याची माहिती मिळते आहे. ढगफुटीचे काही व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. यामध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर एजन्सीच्या माध्यमातून बचावकार्य राबवण्यात येत आहे, अशी माहिती आयटीबीपीने दिली. ढगफुटीमुळे पाण्याचा प्रवाह गुहेजवळूनच गेला असून यामुळे काही लंगरचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली आहे. काही भाविकही याच्या तडाख्यात सापडल्याचे सांगितलं जात आहे.

( हेही वाचा: गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी ६० अतिरिक्त गणपती विशेष गाड्या! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.