अमरनाथ यात्रा आस्मानी संकटानंतर तूर्तास स्थगित, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

82

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 65 जण रुग्णालयात दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 41 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे, ज्यासाठी जम्मू-काश्मीर पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि लष्कर शोध आणि बचाव कार्य करत आहेत.

(हेही वाचा – शिवसेनेच्या तानाजी सावंतांची सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी)

हे आस्मानी सकंट आल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आला असून अनेक रस्ते खचले आहेत. कित्येक वाहने फसली असून लोक वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेकांशी संपर्क होऊ शकत नाही. पुरात अडकलेल्या लोकांचे हॅलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तर या परिसरात अद्याप पावसाचा जोर कायम असून या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू काश्मीर प्रशासनाने तूर्तास स्थगित केली आहे.

ढगफुटीच्या घटनेबद्दल, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने असे सांगितले की, अमरनाथ येथे आलेला पूर हा ढगफुटीमुळे नव्हे तर तेथील पावसामुळे आला असावा. हवामान तज्ज्ञांच्या मते, शुक्रवारी संध्याकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत मंदिरात 31 मिमी पावसाची नोंद झाली, जी ढगफुटी होण्यासाठी खूपच कमी आहे. तर अमरनाथ गुहा मंदिराजवळील पर्वतांच्या उंच भागात पावसामुळे अचानक पूर येण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. IMD नुसार, हवामान केंद्रावर एका तासात 100 मिमी पाऊस पडल्यास पावसाच्या त्या घटनेला ढगफुटी असे म्हणता येईल,

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.