अमरनाथ सेहगल (Amarnath Sehgal) हे प्रसिद्ध भारतीय आधुनिक शिल्पकार, चित्रकार, कवी आणि कलाशिक्षक होते. त्यांनी लाहोरमध्ये इंजिनिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर ते कलेकडे वळले. १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर ते भारतात दिल्लीत स्थलांतरित झाले. १९५० साली त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ एज्युकेशनमधून कला शिक्षण घेतले. मग ते दिल्ली येथील कलामहाविद्यालयात कलाशिक्षक म्हणून काम करू लागले.
१९७९ साली अमरनाथ सेहगल (Amarnath Sehgal) यांनी लक्झेंबर्गच्या ग्रँड डची येथे त्यांचा स्वतःचा स्टुडिओ स्थापन केला. २००४ साली त्यांनी लक्झेम्बर्ग मध्ये वास्तव्य केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री गॅस्टन थॉर्न आणि लक्झेम्बर्गमधील भारताचे राजदूत के.बी. लाल यांच्या उपस्थितीत २१ जून १९७३ साली हेन्री जे. लीर यांनी भेटवस्तू म्हणून दिलेल्या गांधींच्या कांस्य प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले. १९८० सालच्या फेब्रुवारीमध्ये, मूळ प्रतिमा चोरीला गेली आणि १९८२ साली अमरनाथ सेहगल (Amarnath Sehgal) यांनी २ ऑक्टोबर या दिवशी गांधींच्या ११३ व्या जयंतीच्या दिवशी उद्घाटन झालेल्या मूळ मूर्तीची एक प्रतिकृती भेट दिली.
आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी भारत सरकारसोबत १३ वर्षे प्रदीर्घ कायदेशीर खटला लढल्यानंतर बौद्धिक संपदा हक्कांचे, विशेषतः भारतातील कलाकारांसाठी कॉपीराइटमधील नैतिक अधिकारांचे ते प्रणेते बनले. १९६० साली दिल्लीतील विज्ञान भवनासाठी त्यांनी तयार केलेले कांस्य भित्तीचित्र हे १९७९ मध्ये नूतनीकरणादरम्यान, त्यांच्या संमतीशिवाय काढून टाकण्यात आले. सेहगल यांनी १९९२ साली दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला गेला आणि अखेरीस न्यायालयांने २००५ मध्ये त्यांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. १९९३ साली त्यांना भारत सरकारतर्फे भारताच्या राष्ट्रीय कला अकादमी द्वारे ललित कला अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आली. २००८ साली यांना भारत सरकारकडून मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Join Our WhatsApp Community