ई- काॅमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझाॅन कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची कपात होणार आहे. अॅमेझाॅन आपल्या 18 हजार हून अधिक कर्मचा-यांना कामावरुन काढणार आहे. याबाबतची माहिती खु्द्द अॅमेझाॅन कंपनीचे मुख्य कार्यकारी अॅंडी जॅसी यांनी दिली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीचा फटका अॅमेझाॅन कंपनीलादेखील बसला आहे.
कोविड काळात अॅमेझाॅनने मोठ्या संख्येने लोकांची भरती करुन त्यांना कामावर ठेवले होते. पंरतू, कंपनीला आता आपला हाच निर्णय जड जात आहे. त्यामुळेच कंपनी नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय घेणार आहे. 18 हजार कर्मचा-यांच्या कपातीचा अर्थ असा आहे की, कंपनी 70 टक्के नोक-या कमी करण्याचा विचार करत आहे. अॅमेझाॅनने ही नोकर कपात केली तर कोणत्याही ई- काॅमर्स कंपनीमध्ये आतापर्यंतची ही सर्वांत मोठी काॅस्ट कटिंग असेल.
( हेही वाचा: यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा अपघात; सहा जणांचा मृत्यू)
Join Our WhatsApp Community