गांजाच्या तस्करीसाठी अमॅझॉनचा वापर?

103

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर गांजा व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला गेला, या कारणास्तव मध्य प्रदेशातील पोलिसांनी अमॅझॉनच्या स्थानिक अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे, असे मध्य प्रदेशातील भिंड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी १४ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील दोन पुरुषांना २० किलो गांजासह अटक केली आणि यांच्या चौकशीतून आढळून आले की, अमॅझॉनच्या इंडिया शॉपिंग वेबसाइटचा वापर, अमली पदार्थांसाठी आणि विविध राज्यांमध्ये तस्करी करण्यासाठी होत आहे.

तस्करीसाठी वापर

तस्करांनी ड्रग्ज ऑर्डर करण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी अमॅझॉनचा वापर करून आत्तापर्यंत १ हजार किलोग्राम गांजाची विक्री केली होती. ज्याची किंमत तब्बल १ कोटी १० लाख २७ हजार ५५४ एवढी आहे. असा आरोप पोलिसांनी आपल्या निवेदनात केला आहे. गुप्त माहिती आधारित कल्लू पवैया (३०) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (३५) यांना शनिवारी भिंड ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली आणि २० किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला. कल्लू हा विशाखापट्टणम येथून प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स फर्मद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशातील इतर भागात गांजा आणत असे. ब्रिजेंद्रने त्याला या व्यवसायात मदत केली, हे चौकशी दरम्यान आरोपींकडून सांगण्यात आले, असे भिंडचे पोलिस अधीक्षक मनोज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले.

(हेही वापर : मिलींद तेलतुंबडेने चळवळीचा पैसा गाडला जमिनीत! नक्षलवाद्यांकडून शोधाशोध )

अमॅझॉनवर आरोप

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया म्हणाले की, मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अमॅझॉन विरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायदा आणि आयपीसी अंतर्गत कठोर कारवाई करावी. तसेच, अमॅझॉनच्या याप्रकरणी जबाबदार असलेल्या व्यक्तींना ताबडतोब अटक करावी. असेही ते म्हणाले. अमॅझॉनने केवळ बंदी घातलेल्या औषधांच्या व्यावसायिक विक्रीसाठी, आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास परवानगी दिली नाही तर, विक्रीत सक्रिय सहभाग घेतला आहे आणि विक्री मूल्याच्या ६६ टक्के इतका मोठा नफा कमावला आहे, असा आरोप कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.