अंबानी कुटुंबीय धमकी प्रकरणी बोरिवलीतून एक संशयित ताब्यात

89

रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आठ वेळेस धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे. पण फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित व्यक्तीला बोरिवलीतून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तपासणी दरम्यान, बोरिवलीतील MHB कॉलनीमधून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण

रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. . मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे आठही फोन कॉल्स आजच आलेत. येत्या तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे.

(हेही वाचा – नवाब मलिकांविरोधात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा ; समीर वानखेडे यांची तक्रार)

रिलायन्स फाउंडेशन संचलित रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी सांगितले की, आम्हाला 8 फोन कॉल आले होते. आम्ही या धमकी देणाऱ्या फोन कॉलला गांभीर्याने घेतले असून फोन करणारे दहशतवादी असू शकतात असे त्यांनी म्हटले. फोन कॉलची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. रिलायन्सच्या सुरक्षा रक्षकांनाही याची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.