रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी युएसडी १०३ अब्ज संपत्तीसह सर्वांत श्रीमंत भारतीय ठरले आहेत. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती अदानी समूहाचे गौतम अदानी यांनी २०२१ मध्ये संपत्तीत ४९ अब्ज डॉलरची वाढ केली आहे. जगातील सर्वांत श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी १२, तर मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत.
यांचाही यादीत समावेश
हुरून आणि रिअल इस्टेट ग्रुप M3M यांनी मिळून जगातील श्रीमंताची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत ६९ देशांतील २ हजार ५५७ कंपन्या आणि ३ हजार ३८१ अब्जाधीशांचा समावेश आहे. या यादीमध्ये टॉप १० मध्ये मुकेश अंबानी यांची वर्णी लागली आहे. टॉप १० मध्ये असणारे मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला, डीमार्टचे संस्थापक आर. के दमानी आणि स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल या तीन जणांचाही हुरून ग्लोबल रिचच्या अव्वल १०० जणांच्या यादीत समावेश झाला आहे.
एवढी वाढली संपत्ती
पोर्ट-टू-एनर्जी समूह प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर असताना, त्यांची संपत्ती १ हजार ५२३ टक्क्यांनी वाढून ८१ अब्ज डॉलर झाली आहे. १० वर्षांत अंबानींच्या संपत्तीत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानींच्या संपत्तीत १ हजार ८३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये जगात सर्वाधिक वाढ होत असल्याचेही या यादीत म्हटले आहे. २०२१ मध्ये अदानी ग्रुपच्या संपत्तीमध्ये ४९ अब्ज डॉलरमध्ये वाढ झाली आहे. अदानी ग्रुपच्या रिन्यूअबल एनर्जी कंपनी अदानी ग्रीनच्या लिस्टिंगनंतर अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. अदानी यांची संपत्ती १७ अब्ज डॉलरवरून ८१ अब्ज डॉलर इतकी झाली.
( हेही वाचा :इस्रायलमध्ये कोविडच्या ‘या’ नव्या व्हेरियंटचं थैमान, वाचा किती आहे जीवघेणा? )
ही आहेत टाॅप 5 नावं
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती १३३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. २०२१ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीमध्ये २४ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे गौतम अदानीच्या संपत्तीमध्ये २०२१ मध्ये १५३ टक्के वाढ पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर पाहिल्यास SpaceX आणि Tesla चे संस्थापक एलॉन मस्क पहिल्या, Amazon चे जेफ बेजोस दुसऱ्या, तर LVMH चे Bernard Arnault तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचाही ७.६ अब्ज डॉलर संपत्तीसह हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२२ मध्ये समावेश झाला आहे. शिव नाडार आणि फेमली २८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या, सायरस पुनावाला २६ अब्ज डॉलरसह चौथ्या, २५ अब्ज डॉलरसह लक्ष्मी मित्तल पाचव्या क्रमांकावर आहेत.
Join Our WhatsApp Community