प्रसिद्ध ऑनलाईन फर्निचर कंपनी पेपरफ्रायचे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे ह्रदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांनी ५१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लेहमध्ये असताना अंबरीश मूर्ती यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्यासोबत मिळून २०१२ रोजी ‘पेपरफ्राय’ या ऑनलाईन फर्निचर कंपनीची स्थापना केली होती.
पेपरफ्राय ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाह यांनी अंबरीश मूर्ती यांच्या निधनाची ट्विट करत माहिती दिली आहे. आशिष शाह यांनी ट्विट पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, माझे मित्र, मेन्टॉर आणि भाऊ अंबरीश मूर्ती यांचे निधन झाले आहे. काल रात्री अंबरीश लडाखमध्ये होते, जिथे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.’
Extremely devastated to inform that my friend, mentor, brother, soulmate @AmbareeshMurty is no more. Lost him yesterday night to a cardiac arrest at Leh. Please pray for him and for strength to his family and near ones. 🙏
— Ashish Shah (@TweetShah) August 8, 2023
(हेही वाचा – Best Strike : सलग आठ दिवसांनंतर अखेर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला)
२०१२ मध्ये स्वत:ची कंपनी
अंबरीश मूर्ती यांनी २०१२ मध्ये आशिष शाह यांच्यासोबत पेपरफ्राय या फर्निचर आणि होम डेकोरसाठीच्या एक ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. हा व्यवसाय आणि प्रयत्न सफल होईल, याची त्यांनाही खात्री नव्हती. पण, वर्षभरात फर्निचर आणि होम डेकोर व्यवसायात त्यांची चांगली पकड बसली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community