देशभर सर्वत्र मोठ्या उत्साहात होळी (Holi) साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी होळीचे दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करण्यात आली. देश विदेशातही होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतातील विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयातही होळी साजरी झाली. त्यावेळी राजदूतांनी भारतीयांना होळीच्या (Holi) शुभेच्छा दिल्या. सध्या सोशल मीडियाचा काळ आहे, त्यामुळे या माध्यमातून राजदूतांनी या शुभेच्छा देताना मनातील भावना व्यक्त केल्या.
कोणता देशाच्या राजदूतांनी काय दिल्या शुभेच्छा?
- जपान भारतातील राजदूत ओनो कैची यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी दोन्ही हातांमध्ये रंग घेत, ‘तुम्हा सर्वांना आमच्याकडून होळीच्या (Holi) हार्दिक शुभेच्छा; असे म्हणत नंतर त्यांनी हे रंग हवेत उधळले.
- जर्मनचे भारतातील राजदूत डॉ. फिलिप अक्रेमेन यांनीही त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यावेळी ते त्यांच्या कार्यालयात सहकाऱ्यांसोबत होळी (Holi) खेळत होते. त्यानंतर डॉ. अक्रेमेन म्हणतात, हा माझा पहिलाच अनुभव आहे. हा उत्सव खूप चांगला आहे. बुरा ना मानो होली है, हा खूप आनंददायी, उत्साहवर्धक सण आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या (Holi) खूप शुभेच्छा. रंगाचा हा सण तुमच्या जीवनात रंग आणि उमंग आणो.
(हेही वाचा भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक…)
- इस्राइलचे राजदूत कोबी शोशानी यांनीही त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी पुणेरी टोपी परिधान केलेली होती. त्यावेळी त्यांनी इस्रायलच्या प्रसिद्ध गायिकेला हिंदी भाषेत गीत गाण्याची विनंती केली. त्यानंतर शोशानी यांनी, ‘आज भारत होळी (Holi) साजरी करत आहे आणि इस्राईलही या सणामध्ये सहभागी आहे’, असे ते म्हणाले.
- अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाने पोस्ट करून होळीच्या शुभेच्छा दिल्या.
- रशियाच्या दूतावासाचे डेनीस एलीपोव यांनी पोस्ट करून शुभेच्छा देताना म्हटले की, रंगाने मिळतो आनंद, आनंदाने मिळते खूप सारे प्रेम, सर्व भारतीयांना होळीच्या (Holi) खूप शुभेच्छा.
Join Our WhatsApp Community