-
ऋजुता लुकतुके
अदानी समुहाने अंबुजा सिमेंटमधील ५१ टक्के हिस्सेदारी खरेदी केल्यापासून हा शेअर सतत वधारलेला आहे. आणि आकडेवारीच्या निकषांवर सांगायचं तर गेल्या वर्षभरातच या शेअरमध्ये ४४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. अलीकडे मात्र अदानी समुहाने या कंपनीतील आपली भागिदारी काही टक्क्यांनी कमी करण्याचं ठरवलं आहे. कंपनीकडे रोख पैसे असावेत आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी अदानी समुहाने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी अंबुजा सिमेंटचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात ०.९९ टक्क्यांनी वधारून ६१८ वर बंद झाला आहे. शेअरमध्ये ५ अंशांची वाढ बघायला मिळाली. देशभर पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्राला चांगले दिवस आहेत. आणि त्याचेच पडसाद या शेअरवर सकारात्मकरित्या पडताना दिसत आहेत. (Ambuja Cement Share Price)
१. देशातील पहिल्या पाचांतील सिमेंट कंपनी
अंबुजा सिमेंट ही देशातील पहिल्या पाच सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. आणि या क्षेत्रात स्पर्धा असली तरी २०२५ पर्यंत पहिल्या पाच सिमेंट कंपन्यांकडेच देशातील सिमेंट उद्योगातील ५५ टक्के हिस्सेदारी असेल असा एक सरकारी अहवाल समोर आला आहे. त्यामुळे बाजारातील हिस्सेदारी पाहता, अंबुजा सिमेंट हा क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी असेल. अल्ट्राटेक कंपनी पहिल्या स्थानावर असून अंबुजा तिसऱ्या स्थानावर आहे. (Ambuja Cement Share Price)
२. अदानी समुह ५ टक्के हिस्सेदारी विकणार
एकाच आठवड्यापूर्वी अदानी समुहाने तसं सुतोवाच केलं आहे. ऊर्जा आणि सिमेंट उद्योगातील ५ टक्के हिस्सेदारी अदानी समुह विकणार आहे. तसं झाल्यास गुंतवणुकदारांसाठी ही संमिश्र बातमी असेल. एकतर मजबूत सिमेंट कंपनीतील हे शेअर विक्रीसाठी उपलब्ध होतील. दुसरीकडे अदानी सारख्या पहिल्या क्रमांकावरील उद्योगाने गुंतवणूक काही अंशी काढून घेतल्यामुळ नकारात्मक वातावरणही पसरू शकतं. (Ambuja Cement Share Price)
(हेही वाचा- Love Jihad : ताज महंमदने ‘बबलू’ बनून हिंदू मुलीला बनवले ‘नाझिया’; नंतर दिला ‘तिहेरी तलाक’ केले दुसरे लग्न)
३. अंबुजा सिमेंट बिहारमध्ये करणार मोठी गुंतवणूक
अदानी समुह अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून बिहारमध्ये १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यात अर्थातच मोठा सिमेंट प्रकल्प असणार आहे. आणि पायाभूत सुविधा उभारणीत या प्रकल्पाचा मोठा वाटा असणार आहे. कुठल्याही राज्यात सिमेंट कंपनीने केलेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. आणि एकदा प्रकल्प उभा राहिला की, इथं वर्षाला ६० लाख टन सिमेंट तयार होऊ शकेल. (Ambuja Cement Share Price)
४. एफटीएसई, एमएससीआय इंडेक्सचे परस्परविरोधी निर्णय
अदानी समुहाने अंबुजा सिमेंटमधील २.७५ टक्के गुंतवणूक काढून घेतल्यावर या शेअरवर जागतिक संशोधन संस्थांचं लक्ष गेलं आहे. युकेतली एफटीएसई एक्सचेंजने इंडेक्समध्ये अंबुजा सिमेंटचे शेअरमधील फ्लोट वाढवायचं करायचं ठरवलंय. त्यामुळे बाजारात कंपनीचे २० लाख शेअर अचानक उपलब्ध होतील. तर एमएससीआयमध्ये ९८ लाख शेअर कमी होतील. २९ आणि ३० ऑगस्टला या घडामोडी घडणार असल्यामुळे ३ ते ५ दिवस त्यांचा परिणाम शेअरवर जाणवू शकेल. (Ambuja Cement Share Price)
(हेही वाचा- Star – Reliance Merger : व्हायकॉम १८ आणि डिस्नी स्टार विलिनीकरणाच्या अटी काय? नवीन कंपनी कशी काम करणार?)
५. अंबुजा सिमेंटमधील ब्लॉक डील
शेअर बाजाराच्या कामकाजाच्या व्यतिरिक्त जेव्हा दोन कंपन्या किंवा व्यक्तींमध्ये बोलणी होऊन खूप मोठ्या प्रमाणावर शेअरची खरेदी विक्री होते, तेव्हा याला ब्लॉक डील असं म्हटलं जातं. अशा व्यवहारांची माहिती शेअर बाजाराला देणं महत्त्वाचं असतं. अंबुजा सिमेंटमध्ये आठवड्याच्या सुरुवातीलाच एक ब्लॉक डील बघायला मिळालं. अमेरिकेतील जीक्यूजी इमर्जिंग मार्केट इक्विटी फंड कंपनीने अंबुजा सिमेंटमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे. कंपनीचे ८८,००० कोटी रुपयांचे शेअर या कंपनीकडे आहेत. या आठवड्यात कंपनीने अंबुजा सिमेंटमधील गुंतवणूक वाढवली आहे. (Ambuja Cement Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community