अमेरिका आणि ब्रिटनने लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हौथी बंडखोरांविरुद्ध (America Air Strike On Houthi) मोठी कारवाई केली आहे. खरे तर, दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमधील अनेक ठिकाणी हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये हौथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांची अनेक ठिकाणे नष्ट झाली आहेत. अमेरिका-ब्रिटन हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेने केली हल्ल्याची पुष्टी –
या हल्ल्याची पुष्टी करत व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, हौथी बंडखोर (America Air Strike On Houthi) लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करत होते. इस्रायल-हमास युद्धापासून हौथी बंडखोर पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाल समुद्र प्रदेशातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करीत आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांच्या सुरक्षिततेवर परिणाम होत होता. अमेरिकेच्या नौदलाने हौथींचे हल्ले वारंवार हाणून पाडले आहेत. अमेरिकेनेही इशारा दिला होता की जर हल्ले थांबले नाहीत तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील. आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने देखील पाळत ठेवली होती. हौथी बंडखोर (America Air Strike On Houthi) आणि समुद्री चाच्यांचे हल्ले हाणून पाडण्यासाठी भारतानेही अरबी समुद्र आणि लाल समुद्रात आपल्या पाच युद्धनौका तैनात केल्या आहेत.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : 1008 नर्मदेश्वर शिवलिंग, 21000 पुजारी…अयोध्येत सरयूच्या तीरावर ‘राम नाम महायज्ञ’)
British and American warships have launched air strikes against Houthi rebels in Yemen. Multiple sites have been targeted, including training bases and drone storage sites. This joint military action is in response to the group’s recent targeting of… https://t.co/zPibaWzh6d
— The America One News (@am1_news) January 12, 2024
नौवहन स्वातंत्र्याशी तडजोड करणार नाही – अमेरिका
लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर, हौथी हल्ल्यांपासून (America Air Strike On Houthi) व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यासाठी गेल्या महिन्यात अमेरिकेने इतर २० हून अधिक देशांसह ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन सुरू केले, असे व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, १३ सहयोगी देशांसह, आम्ही हौथी बंडखोरांना इशारा दिला की त्यांनी व्यापारी जहाजांवर हल्ला करणे थांबवले नाही तर गंभीर परिणाम होतील. हुथी बंडखोरांविरुद्धचे आजचे हवाई हल्ले हा एक स्पष्ट संदेश आहे की अमेरिका आणि तिचे सहयोगी जगातील सर्वात महत्त्वाच्या नौवहन व्यावसायिक मार्गावर नौवहन स्वातंत्र्याशी तडजोड करणार नाहीत.’
(हेही वाचा – Narendra Modi: देशातील सर्वात लांब सागरी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन)
यामुळे जगभरात महागाई वाढली –
हौथींना इराणचा पाठिंबा (America Air Strike On Houthi) असल्याचे मानले जाते. इस्रायल-हमास युद्धापासून हौथी लाल समुद्र आणि अरबी समुद्र भागातील आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांवरून जाणाऱ्या जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत. परिणामी, आंतरराष्ट्रीय नौवहन विस्कळीत झाले. माध्यमांच्या वृत्तानुसार, हौथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे गेल्या काही महिन्यांत सुमारे २०० अब्ज डॉलर्सचा व्यापार लाल समुद्रातून वळवण्यात आला आहे. यामुळे जगभरात महागाई वाढली आहे. तथापि, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर, इस्रायल-हमास युद्धामुळे आधीच तणावग्रस्त असलेल्या पश्चिम आशियामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. (America Air Strike On Houthi)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा; मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम स्थळांची पाहणी)
गरज भासल्यास पुढील लष्करी कारवाईचे आदेश –
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी (११ जानेवारी) सांगितले की, लाल समुद्रातील नौवहनांवरील (America Air Strike On Houthi) हल्ल्यांनंतर अमेरिका आणि ब्रिटीश सैन्याने इराण समर्थित हौथी बंडखोरांवर येमेनमध्ये हवाई हल्ले केले. गरज भासल्यास पुढील लष्करी कारवाईचे आदेश देण्यास आपण अजिबात संकोच करणार नाही, असे बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. हुथी सैन्याच्या सूत्रांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, येमेनमधील अनेक शहरांवर हवाई हल्ले झाले, जिथे हुथी सैन्याचे नियंत्रण आहे. (America Air Strike On Houthi)
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर, कसे असेल स्वरुप? वाचा सविस्तर…)
या हल्ल्यांमध्ये लढाऊ विमाने आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रे यांचा समावेश होता, असे अमेरिकेच्या अनेक माध्यमांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community