अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार; महापौरांसह 18 जण ठार

128

अमेरिकेच्या मेक्सिकन सिटी हाॅलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतांमध्ये महापौरांचाही समावेश आहे.

हाॅलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हाॅलमध्ये एक कार्यक्रम सुरु होता त्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हाॅलमध्ये प्रवेश केला, त्यावेळी तो काही सेकंद थांबला आणि अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला. यात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

( हेही वाचा: बाळासाहेब ज्यांना सवंगडी समजायचे, त्यांना तुम्ही घरघडी समजलात! )

भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची काही छायचित्रे समोर आली आहेत. ज्यात एका भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. किमान 30-35 गोळ्या दिसत आहेत. तर, पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे आणखी एक चित्र समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र एका संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.