अमेरिकेत दोन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीला डुकराचे हदय प्रत्यारोपित करण्यात आले होते. जगातील ही पहिलीच अशा प्रकारची शस्त्रक्रिया होती. आता, त्या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. शस्त्रक्रिया करणा-या मेरिलॅंड रुग्णालयाने बुधवारी याची माहिती दिली.
अनोखी शस्त्रक्रिया
डेव्हिड बेनेट (57) युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरमध्ये 7 जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना डुकराचे हृदय देण्यात आले. बेनेटच्या मुलाने या अभिनव प्रयोगासाठी रुग्णालयाचे कौतुक केले. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या मुलाने सांगितले की, हा प्रयोग यशस्वी होईल याची शाश्वती नाही, हे त्यांच्या वडिलांना माहीत होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावू लागली आणि मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.
( हेही वाचा: Russia-Ukraine War : खाद्यतेलाच्या दरात भरमसाठ वाढ! जाणून घ्या दर )
व्हिडीओ समोर आला होता
सुरुवातीला, डुकराचे हृदय बेनेटच्या शरीरात काम करत होते. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणीही केली जात होती. बेनेट हळूहळू बरे होत होते. गेल्या महिन्यात त्यांनी रुग्णालयातून एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ते त्यांच्या फिजिकल थेरपिस्टसोबत असल्याचं दिसतं. रुग्णालयात बेडवर ते फुटबॉल सामना बघत होते.
Join Our WhatsApp Community