अमेरिकेतील अलाबामा येथे ब्लाॅक हाॅक हेलिकाॅप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह 2 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकाॅप्टर डाउनटाउन हंट्सविलेपासून सुमारे 10 मैल अंतरावर अलाबामा- टेनेसी सीमेजवळ महामार्ग 53 वर क्रॅश झाले.
समोर आलेल्या माहितीनुसार, हे टेनेसी नॅशनल गार्डचे UH-60 हेलिकाॅप्टर होते जे नियमित प्रशिक्षणावर होते. मॅडिसन पोलीस अधिका-यांना स्थानिक वेळेनुसार पहाटे 3 च्या सुमारास 911 वर काॅल आला.
( हेही वाचा: प्राणिसंग्रहालयाचा शैक्षणिक कृती आराखडा: देशातील विविध प्राणिसंग्रहालयातील शिक्षण अधिकाऱ्यांची तीन दिवसीय कार्यशाळा भरली राणीबागेत )
अपघाताची चौकशी केली जाणार
अपघातानंतर हेलिकाॅप्टरला आग लागली त्यामुळे कोणीही वाचू शकले नाही. मात्र, हेलिकाॅप्टर का कोसळले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. नॅशनल गार्डच्या अधिका-याने सांगितले की, उर्वरित लष्करी विमानांप्रमाणे या हेलिकाॅप्टरच्या अपघाताचीही चौकशी केली जाईल. अपघाताच्या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.
Join Our WhatsApp Community