कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत भारताने सौदी अरब आणि इराकला धक्का दिला आहे. आखाती देशांकडून होणारी खरेदी कमी केली असून, जुना मित्र रशिया हा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये रशियाकडून भारताने 9 लाख 34 हजार 556 बॅरल्स एवढे कच्चे तेल दररोज खरेदी केले आहे. कच्च्या तेलाच्या आयातींपैकी रशियाकडून भारताने 22 टक्के खरेदी केली आहे. युक्रेन युद्धानंतर या खरेदीत प्रचंड वाढ झाली आहे. व्होर्टेक्सा कार्गो ट्रॅकर संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून केवळ 0.2 टक्के कच्चे तेल खरेदी करत होता. युद्धानंतर जगभरात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले. अशावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवण्याचा निर्णय घेतला. युक्रेन युद्धानंतर पश्चिमेकडील देशांनी रशियावर निर्बंध घातले. अमेरिकेनेही भारताकडे डोळे वटारुन रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, दबाव झुगारुन भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे.
( हेही वाचा: ठाकरे गट आणि मनसेच्या साडे तीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश )
भारतीयांच्या गरजेची पूर्तता करणं आमचं कर्तव्य
भाराताची लोकसंख्या 1.34 अब्ज एवढी आहे. त्यांची गरज पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी स्वस्त असेल तेथून भारत कच्चे तेल खरेदी करणार, अजूनही युरोप रशियाकडून एका दिवसात दुपारपर्यंत जेवढे तेल खरेदी करतो, त्यातुलनेत हे केवळ एक चतुर्थांश आहे, असे भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले.
Join Our WhatsApp Community