मायकेल फॅरँड बेनेट (Michael Bennett) हे अमेरिकन अधिवक्ता, उद्योगपती आणि राजकारणी आहेत. ते कोलोरॅडो येथील सिनियर युनायटेड स्टेट्स सिनेटर (Senior United States Senator) म्हणून काम करत आहेत. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. त्यांचा २८ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांचा बेनेट यांनी यापूर्वी Anschutz Investment Company चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे.
(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue : ‘ते’ सर्व मजूर सुखरूप बाहेर; उत्तरकाशीत जल्लोष)
वडील उपराष्ट्राध्यक्ष ह्युबर्ट हम्फ्रे यांचे सहाय्यक
बेनेट यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९६४ रोजी नवी दिल्ली येथे झाला. बेनेट वॉशिंग्टन डी.सी. (Washington DC) येथे लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील उपराष्ट्राध्यक्ष ह्युबर्ट हम्फ्रे यांचे सहाय्यक होते, तसेच ते इतर अनेक राजकीय नेत्यांचे सहाय्यक होते.
१९८७ मध्ये बेनेट यांनी वेस्लेयन विद्यापीठातून (Wesleyan University) इतिहासामध्ये कला शाखेची पदवी घेतली. १९९३ मध्ये त्यांनी येल लॉ स्कूलमधून ज्युरीस डॉक्टरची पदवी प्राप्त केली.
(हेही वाचा – Ajit Pawar : तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)
डेन्व्हर पब्लिक स्कूल सिस्टीमचे अधीक्षक
२००३ ते २००५ दरम्यान Michael Bennett यांनी तत्कालीन महापौर जॉन हिकेनलूपर यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आणि जुलै २००५ मध्ये डेन्व्हर पब्लिक स्कूल सिस्टीमचे ते अधीक्षक झाले.
२०१० मध्ये त्यांनी केन बक यांचा पराभव करुन सिनेट निवडणूक जिंकली. २०१४ दरम्यान त्यांनी डेमोक्रेटिक सेनेटोरियल कॅम्पेन कमिटीचे (Democratic Senatorial Campaign Committee) अध्यक्षपद देखील भूषविले आहे. ते २०१६ आणि २०२२ मध्ये पुन्हा निवडून आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community