मायकेल रुबेन्स ब्लूमबर्ग हे एक अमेरिकन व्यापारी, राजकारणी, समाजसेवक आणि लेखक आहे. ते ब्लूमबर्ग एल.पी. चे मालक आणि सह-संस्थापक आहेत. २०१४ ते २०२३ दरम्यान ते कंपनीचे सीईओ होते. ब्लूमबर्ग (Michael Bloomberg) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९४२ रोजी बोस्टन येथे झाला. ते ज्यू पंथाचे आहे.
ब्लूमबर्ग यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी प्राप्त केली. १९८१ मध्ये त्यांनी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म सॉलोमन ब्रदर्समध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. ब्लूमबर्ग एल.पी. ही एक फायनॅन्शियल इन्फो, सॉफ्टवेअर आणि मीडिया फर्म आहे. मायकेल ब्लूमबर्ग (Michael Bloomberg) यांनी या कंपनीत वीस वर्षे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. फोर्ब्सने त्यांची जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद केली आहे.
२०२० च्या डेमोक्रॅटिक नामांकनासाठी उमेदवार म्हणून उभे राहिले
मायकेल ब्लूमबर्ग यांनी २००२ ते २०१३ दरम्यान तीन वेळा न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून काम केले आहे. तसेच युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षपदासाठी २०२० च्या डेमोक्रॅटिक नामांकनासाठी उमेदवार म्हणून उभे राहिले होते. जून २०२२ पासून युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर, डेटा आणि डिजिटल मॉडर्नायझेशनवर सल्ले देणार्या डिफेन्स इनोव्हेशन बोर्ड, इंडिपेंडेंट ऍडव्हायजरी बोर्डचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. विशेष म्हणजे ब्लूमबर्ग (Michael Bloomberg) हे समाजकार्यातही पुढाकार घेतात.
Join Our WhatsApp Community