अमेरिकेच्या नागरिकांना गायींच्या सहवासात मिळते मनःशांती! तासाला २०० डॉलर मोजतात! 

सध्या अमेरिकेतील जनता कोरोना महामारीमुळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेली आहे. म्हणून तेथील जनता मनःशांती मिळवण्यासाठी चक्क गायींच्या गोठ्यात जात आहेत. तिला मिठी मारत आहेत. तिच्याशी मूक संवाद साधत आहेत. ज्याला 'काऊ थेरेपी' म्हणून संबोधण्यात येत आहे. 

176

भारतात गायीचे महत्व सांगणारा हा धर्मांध ठरतो, बुरसटलेल्या विचारांचा म्हणून टीकेला पात्र ठरतो. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते म्हणून हिंदू विरोधी घटक विशेषतः तथाकथित समाजवादी, पुरोगामी, सर्वधर्म समभाव याचा आव आणणारे गायी हा साधारण पशू आहे. तिची हत्या करणे, मांस खाणे गैर नाही, असे म्हणत गायीचे महत्व नाकारतात. पण जे भारतातील नागरिकांना समजले नाही, ते गायीचे महत्व अमेरिकेतील नागरिकांना समजले आहे. सध्याच्या कोरोना महामारीत मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेले अमेरिकेतील नागरिक आता गायींच्या सान्निध्यात राहून मनःशांती मिळवत आहेत.

(हेही वाचा : कोरोना ‘मेड इन चायना’! जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल! )

गोठ्यात जाऊन गायीसोबत राहतात! 

सीएनबीसी वृत्तवाहिनीने हे सविस्तर वृत्त दिले आहे. ते वृत्त चक्क काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विट केले आहे. यात दिलेल्या वृत्तानुसार, सध्या अमेरिकेतील जनता कोरोना महामारीमुळे मानसिक स्वास्थ्य हरवून बसलेली आहे. सततच्या संसर्ग होण्याच्या भीतीने, लॉकडाऊनच्या कारणाने अमेरिकेतील जनता त्रस्त झाली आहे. सर्व आधुनिक साधनसंपत्ता असूनही अमेरिकेतील जनता मनःशांती मिळवण्यासाठी चक्क गायीच्या गोठ्यात जात आहेत. तिला मिठी मारत आहेत. तिच्याशी मूक संवाद साधत आहेत.

तासाला २०० डॉलर मोजतात! 

या ठिकाणी काही गायींना पकडून एक प्रकराची गोशाळा उभारण्यात आली आहे. त्या ठिकाणी विविध जातीच्या गायी आहेत. या ठिकाणी सध्या अमेरिकेतील नागरिकांची गर्दी वाढलेली आहे. इथे नागरिक २०० डॉलर प्रति तासासाठी मोजतात आणि तेवढा तास येथील गायींच्या सान्निध्यात राहतात. त्या दरम्यान ते गायीला मिठी मारतात, तिच्या अंगावर पहुडतात. असे केल्याने त्यांचा ताणतणाव कमी होतो, त्यांना सध्याच्या अस्वस्थ करणाऱ्या काळात मनशांती मिळत आहे, अशी प्रतिक्रिया येथे येणारे अमेरिकेतील नागरिक देत आहे. त्यामुळे ही जरी भारतासाठी अभिमानाची बाब असली, तरी तितकीच ती लज्जास्पद आहे. कारण भारतातील नागरिकांना तिचे महत्व नाही. सहज उपलब्ध होणार हा पशु म्हणजे साधारण समजला जातो. गायीला हिंदू धर्मात पवित्र समजले जाते म्हणून तो अन्य धर्मीय तिचे महत्व नाकारतात. ती केवळ एक पशु आहे, असे म्हणणारे तिचे मांस परदेशात निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोहत्या होते आणि तिच्या मांसाची तस्करी केली जाते, तेव्हा त्याचे ते समर्थन करताना दिसतात. भाकड गायीला जिवंत ठेवून काय उपयोग? तिला कसायाकडे दिले तर काय हरकत? असे म्हणतात.

New Project 5 14

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.