कोरोनावर सुरूवातीला कोणताच उपाय नसल्यामुळे जवळपास दोन वर्ष संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोना प्रतिबंधक लसल बनविण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या जोरदार तयारी करत होत्या यापैकी काही कंपन्यांना लवकर यश आले. आता कोरोनाच्या लसीकरणावरून नवा वाद सुरू झाला आहे. अमेरिकेच्या फार्मा कंपनीने पुण्याच्या बड्या कंपनीवर खटला दाखल केला आहे.
( हेही वाचा : आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी हे आहेत नवे नियम! )
लसीचा फॉर्म्युला चोरला
अमेरिकेच्या एचडीटी बायो कॉर्पने वॉशिंग्टनमधील न्यायालयात पुण्याच्या एमक्युअरविरोधात लसीचा फॉर्म्युला चोरून लस उत्पादित केल्याचा आरोप करत ९५ कोटी डॉलर्सचा दावा दाखल केला आहे. पुण्याच्या कंपनीने नवीन कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला होता आणि त्याचे उत्पादन केल्याचे अमेरिकेच्या एचडीटी बायो कॉर्पने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाशी काहीही संबंध नाही
पुण्याच्या एमक्युअर कंपनीच्या प्रवक्तांनी एमक्युअरची उपकंपनी जेनोआ या कंपनीने भारतात कोरोना लस बनविणे आणि विकण्याचे लायसन दिले होते. जो खटल्याचा विषय आहे, तो जेनोआ बायोफार्मास्युटिकल्स आणि एचडीटी यांच्यात आहे. एमक्युअर फार्माचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा दावा रद्द करण्यासाठी कंपनी आवश्यक कायदेशीर पावले उचलणार आहे असेही कंपनीने सांगितले.
Join Our WhatsApp Community