Michael Jordan : अमेरिकन उद्योजक आणि बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन

बास्केटबॉलमधील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात जगभरात बास्केटबॉल आणि NBA ला लोकप्रिय करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

272
Michael Jordan : अमेरिकन उद्योजक आणि बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन

मायकेल जेफ्री जॉर्डन (Michael Jordan) यांचा जन्म न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन येथे १७ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला. त्यांचे वडील जेम्स आर. जॉर्डन सीनियर हे इक्विपमेंट सुपरव्हायजर होते आणि आई बँक कर्मचारी होती, तिचं नाव डेलोरिस. मायकेल जॉर्डन यांना MJ या नावाने देखील ओळखले जाते. ते एक अमेरिकन उद्योजक आणि माजी व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आहेत. (Michael Jordan)

त्यांनी १९८४ ते २००३ दरम्यान National Basketball Association (NBA) मध्ये पंधरा सीजन गाजवले आहेत खेळले आणि शिकागो बुल्ससोबत सहा NBA चॅम्पियनशिपवर विजय नोंदवला आहे. बास्केटबॉलमधील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. १९८० आणि १९९० च्या दशकात जगभरात बास्केटबॉल आणि NBA ला लोकप्रिय करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. जोर्डन (Michael Jordan) हे त्यांच्या पिढीतील सर्वात प्रभावीपणे मार्केटिंग करणारे खेळाडू होते. अनेक ब्रॅंडसाठी त्यांनी मार्केटिंग केली आहे. (Michael Jordan)

(हेही वाचा – CRIME: लैंगिक अत्याचार करणाऱ्या नौशाद शेखच्या अनधिकृत बांधकामावर फिरला बुलडोझर)

ते २००६ मध्ये शार्लोट हॉर्नेट्ससाठी बास्केटबॉल ऑपरेशन्सचा पार्ट-ओनर झाले आणि प्रमुखपदही त्यांनी मिळवले. त्याचबरोबर NASCAR कप मालिकेतील 23XI रेसिंगचीही मालकी त्यांच्याकडे आहे. २०१६ मध्ये, ते NBA च्या इतिहासातील पहिला अब्जाधीश खेळाडू झाले. ही सर्वोत्कृष्ट उपलब्धी होती. त्या वर्षी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित केले. २०२३ पर्यंत त्यांची एकूण संपत्ती $३ अब्ज इतकी आहे अशी नोंद फोर्ब्सने केली होती. (Michael Jordan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.