अमित शहा पुणे दौऱ्यावर! बदलणार का राजकीय समीकरण?

100

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या रविवारी १९ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा थेट पुणे महापालिकेत येणार असून त्यांच्या शुभहस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सकाळी दहा वाजता पुणेकरांचे श्रध्दास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त हेमंत रासने यांनी कळविली आहे. सध्या पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष सक्रिय आहेत, जिल्ह्याच्या राजकारणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पवार प्रयत्नरत आहेत, अशा वेळी अमित शहा यांचा पुणे दौरा भविष्यात राजकीय समीकरण बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

पुणे दौरा

पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमिपूजन कार्यक्रम, महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण,  शहर भाजपच्या बूथ समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा अशा विविध कार्यक्रमांसाठी शाह पुणे भेटीवर येत असून, त्या वेळी ते गणपतीचे दर्शन घेणार आहेत, असे रासने यांनी स्पष्ट केले. या पूर्वी दोन वेळा ते सपत्नीक दर्शनाला आले आहेत. पाच वर्षांपूर्वी ५ जून २०१६ रोजी पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले होते.

( हेही वाचा : आता ठाणेकरांच्याही ख्रिसमस पार्ट्यांवर विरजण! )

अमित शाह येत असल्याचा विशेष आनंद

दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार असून गृहमंत्री अमित शाह हे स्वतः महापालिकेत येत असल्याचा विशेष आनंद आहे. असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.