जगभरात आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये (Mahakumbh) सोमवार, २७ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उपस्थित लावली, यावेळी मंत्री अमित शाह यांनी अतिशय श्रद्धापूर्वक अमृत स्नान केले. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले.
अमित शाह (Amit Shah) यांनी सकाळीच सोशल मीडिया हँडल X वर अमृत स्नान केल्याचा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले होते की, कुंभ (Mahakumbh) हे समरसतेवर आधारित जीवनाचे आपले शाश्वत तत्वज्ञान आहे. आज मी प्रयागराज या धार्मिक नगरीमध्ये एकता आणि अखंडतेच्या या महान उत्सवात संगमात स्नान करण्यासाठी आणि संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे. त्यासाठी मी उत्सुक आहे.
‘महाकुंभ’ सनातन संस्कृति की अविरल धारा का अद्वितीय प्रतीक है।
कुंभ समरसता पर आधारित हमारे सनातन जीवन-दर्शन को दर्शाता है। आज धर्म नगरी प्रयागराज में एकता और अखंडता के इस महापर्व में संगम स्नान करने और संतजनों का आशीर्वाद लेने के लिए उत्सुक हूँ।
— Amit Shah (@AmitShah) January 27, 2025
(हेही वाचा जेपीसीने Waqf विधेयकाला दिली मंजुरी; किती केल्या आहेत सुधारणा?)
प्रयागराज येथे पोहोचल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्यांचे पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत केले. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बडे हनुमानजी मंदिर आणि अक्षय वट येथे जाणार आहेत. यासोबतच ते महाराज आणि इतर संतांसोबत भोजन करतील आणि जुना आखाड्याला भेट देतील. धर्मनगरीच्या भेटीदरम्यान ते गुरू शरणानंद जी यांच्या आश्रमात जाऊन गुरू शरणानंद जी आणि गोविंद गिरी जी महाराज यांची भेट घेतील. यानंतर ते शृंगेरी, पुरी आणि द्वारकाच्या शंकराचार्यांचीही भेट घेतील.
Join Our WhatsApp Community