मुंबई-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) सहकुटुंब मुंबईत शनिवारी गणेश दर्शनासाठी येणार आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अमित शहा हे प्रथम मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन घरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोड बंदोबस्त लावला आहे.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता चिंचपोकळी येथील लालबागचा राजा गणेश मंडळाला भेट देतील, लालबागच्या राजाच्या दर्शन घेतल्यानंतर त्यांचा मुंबईतील पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली. शहा यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा एजन्सी आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे एक मजबूत सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. अमित शहा आणि त्यांचे कुटुंबीय लालबागच्या राजाच्या चरणी आशीर्वाद घेण्याची ही पहिलीच वेळ नसून गेल्यावर्षी देखील शहा हे कुटुंबासोबत लालबागच्या दर्शनासाठी येऊन गेले होते.
(हेही वाचा-Chandrayaan 3 : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अद्याप स्लीप मोडवर; शनिवारी इस्रो करणार रिलाँन्च)
लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेतल्यानंतर अमित शहा यांच्या दौऱ्यात गणपती बाप्पाच्या पुढील दर्शनासाठी भाजप नेत्यांच्या घरी जाण्याचा समावेश आहे. शनिवारी दुपारी २ वाजता शहा (Amit Shah) यांचे मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. दुपारी ३ वाजता लालबागच्या राजाचे दर्शन त्यानंतर दुपारी ३:५० ते ४ मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बाप्पाचे दर्शन, दुपारी ४ ते ४:१५ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी येथे भेट घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेणार दुपारी
साडेचार वाजता वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतील. संध्याकाळी साडेपाच ते सात मुंबई विद्यापीठातील लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यानाला उपस्थिती, संध्याकाळी ७ वाजता दिल्लीसाठी प्रयाण करतील.
Join Our WhatsApp Community