बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षका(बॉडीगार्ड)ची मुंबई पोलिस आयुक्तांकडून बदली करण्यात आली आहे. जितेंद्र शिंदे असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून, त्याची डी.बी. मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्याकडून शिंदेला वार्षिक अंदाजे दीड कोटी रुपये दिले जात असल्याच्या आरोपावरुन ही बदली करण्यात आली असल्याचे समजत आहे.
काय आहे कारण?
सचिन वाझे प्रकरणानंतर वारंवार पोलिस खात्यातील अधिका-यांविरुद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पोलिस खात्याची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त सक्रीय झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना सुरक्षा देणारा पोलिस दलातील सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदे पगाराव्यतिरिक्त कमाईसाठी आणखी काही स्त्रोत वापरत असल्यामुळे, आयुक्तांनी त्याची बदली केल्याचे बोलले जात आहे. मात्र पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणा-या पोलिस कर्मचा-यांची बदली करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले असून, त्यातूनच ही बदली करण्यात आली असल्याचे पोलिस खात्याकडून सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः वसुली गॅंग पार्ट- ३: उपायुक्तांसह पोलिस निरीक्षकांवर खंडणीचा गुन्हा दाखल)
कोण आहे जितेंद्र शिंंदे?
2015 पासून बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून जितेंद्र शिंदे कार्यरत होता. त्याची आता डी.बी. मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्याच्या कार्यकाळात अमिताभ बच्चन यांच्याकडून त्याला दरवर्षी अंदाजे दीट कोटी रुपये दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जितेंद्रच्या पत्नीचीही एक सिक्युरिटी एजन्सी असून, त्यात जितेंद्र पैसे गुंतवत असल्याचा दावाही केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
(हेही वाचाः आळशी पोलिस एफआयआर ऐवजी तक्रारदाराला देतात प्रमाणपत्र)
Join Our WhatsApp Community