बाॅलिवूड महानायक अमिताभ बच्चन शुटिंगदरम्यान जखमी; उपचार सुरु

120

महानायक अमिताभ बच्चन हे हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने संबंधित सिनेमाचे शुटिंगही रद्द करण्यात आले. बिग बींवर हैदराबादमध्ये उपचार करण्यात आले असून ते हैदराबादमधून मुंबईत परतले आहेत, बिग बी यांनी त्यांच्या ब्लाॅगद्वारे त्यांना दुखापत झाल्याची माहिती दिली. ते सध्या हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के च्या शुटिंगसाठी गेले होते. या सिनेमात अॅक्शन सीन शूट करताना ते जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

( हेही वाचा: विद्यार्थ्यांनी पुस्तकापर्यंत मर्यादित न राहता कला- क्रीडा क्षेत्रात विकास करावा- आश्विनी भिडे )

ब्लाॅगद्वारे बीग बींनी दिली माहिती 

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या मुंबईतील जलसा बंगल्यात आराम करत आहेत. याठिकाणाहूनच त्यांनी ब्लाॅग लिहत झालेल्या जखमेची माहिती दिली. शनिवारी ब्लाॅग लिहिताना बिग बींनी लिहिले की, हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शुटिंगदरम्यान अॅक्शन सीन शूट करताना मी जखमी झालो. बरगड्यांच्या मांसपेशींना दुखापत झाली. त्यामुळे शुटिंग रद्द करण्यात आले आहे. हैदराबादमध्ये AIG रुग्णालयामध्ये डाॅक्टरांचा सल्ला घेतला असून सीटी स्कॅनही केले. आता घरी परतलो आहे. मलमपट्टी करण्यात आली असून, सध्या मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.