Photo Exhibition : वन्य जीवनावर प्रकाशझोत टाकणारे अमोल हेंद्रेंचे इंडोनेशियातील अनोखे चित्र प्रदर्शन 

या प्रदर्शनात हेंद्रे यांनी काढलेल्या जवळपास ५९ फोटोंचा समावेश करण्यात आला होता.

153

नवी मुंबई येथील प्रसिद्ध अशा आयु एक्सपिडीशन या ट्रॅव्हल कंपनीचे संस्थापक अमोल हेंद्रे यांनी ‘My Passion and Boyond’ ही संकल्पना घेवून भारताबाहेरील पहिले वहिले असे वन्यजीवन ह्या संकल्पनेनेवर आधारित “वाईल्ड फोटोग्राफी एक्जीबिशन”  हे इंडोनेशिया ह्या छोट्याशा देशातील बाली शहरातील उबुड येथे तमन देदारी ह्या सगळ्यात प्रसिध्द आणि लोकप्रिय अशा आर्ट गॅलरीमध्ये ११ आणि १२ मे २०२३ रोजी यशस्वीरित्या संपन्न केले. इंडोनेशियातील बाली शहरात अशा पद्धतीच वाइल्डलाइफ (वन्य) जीवनावरील आधारीत छायाचित्र प्रदर्शन आयोजित करणारे अमोल हेंद्रे हे पहिले भारतीय आणि महाराष्ट्रीयन छायाचित्रकार ठरले आहेत.

tiger

या प्रदर्शनात त्यांनी काढलेल्या जवळपास ५९ फोटोंचा समावेश करण्यात आला होता. या फोटोमध्ये लक्षवेधी फोटो हे वाघ, सिंह आणि चित्ता यांसारख्या शिकारी प्राण्यांचे होतेच, पण त्याशिवाय त्यांनी काढलेले स्थानिक आफ्रिकन प्राणी, पक्षी आणि आशियातील समुद्राशी संलग्न असलेल्या अशा वेगवेगळ्या वन्यजीवांचे फोटोही प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले. उबुड शहरातील रॉयल पॅलेस घराण्याचे राजे श्री (नाव proper type करणे) भेट दिली व प्रदर्शनाची तोंड भरून कौतुक केले. अमोल हे जरी पेशाने ट्रॅव्हल कंपनीचे मालक आहेत तरी त्यांनी स्वतःची फोटोग्राफीची आवड जपली असून त्याला आता एक व्यावसायिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न या एक्झिबिशनच्या माध्यमातून त्यांनी यशस्वीरित्या करून दाखवला. अमोल हे एक व्यावसायिक वन्यजीव आणि लँडस्केप फोटोग्राफीमध्ये तज्ज्ञ आहेत.  ह्याची झलक ह्या वेळी दिसून आली. गेली १७ वर्ष ते पर्यटनाच्या निमित्ताने केनिया, बाली श्रीलंका अशा देशांना भेट देत आहेत आणि तिकडच्या अभयारण्यात फिरताना त्यांनी त्यांच्या कॅमेरातून प्राण्यांची खूप सारी छायाचित्र टिपली आहेत आणि त्यातील निवडक छायाचित्र या प्रदर्शनात त्यांनी रसिका प्रेक्षकांसाठी ठेवली होती. येत्या वर्षाखेरीस  डिसेंबर २०२३ मध्ये अशाच पद्धतीचे दुसरं एक्जीबिशन श्रीलंकेत करण्याचा मनोदय अमोल हेंद्रे यांनी बोलून दाखवला.

(हेही वाचा Congress : केजरीवालांना समर्थन देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट; गहलोत आणि पायलट वादावर तोडगा काढण्याचा बैठकीत प्रयत्न)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.