अमरावती जिल्हा पुन्हा एकदा हादरलं आहे. एकाच दिवसात दोन अत्याच्याराच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनेतील पिडीत मुली या अल्पवयीन असून अमरावतीच्या वरूड तालुक्यातील शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन हद्दीतील सातनुर गावात एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
(हेही वाचा – पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन, ‘या’ मागण्यांसाठी MPSC चे विद्यार्थी उतरले रस्त्यावर)
अल्पवयीन पीडितेने पोलीस स्टेशनला याप्रकरणी तक्रार दिली. यामध्ये तिने असे म्हटले की, तिच्या ओळखीतील एका महिलेने मनीष सदापुरे यांच्या घरी बोलावत असल्याचा निरोप तिला दिला. पीडिता त्या युवकाच्या घरी पोहचल्यावर तेथे आधीच दबा धरून बसलले चार जणं असे एकूण पाचही आरोपींनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यावेळी निरोप देणाऱ्या महिलेने घराचे दार बाहेरून बंद करून ठेवल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर कशीबशी सुटका करून ही तरूणी सुखरूप आपल्या घरी पोहोचली. यानंतर ८ दिवसांनी आरोपांपैकी एक असलेल्या मुलाने या पीडितेला पुन्हा महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले आणि ८ दिवसांपूर्वी झालेली अत्याचाराची घटना सर्वांना सांगण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला.
दोन वेळा झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर धास्ती घेतलेल्या मुलीने याबद्दल आपल्या पालकांना सांगितले. यानंतर लगेच १७ डिसेंबर रोजी रात्री शेंदूरजना घाट पोलिसांना तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी मनीष सदापुरे (25),अमोल बोके (24), पियुष डोके (22), केशव वंजारी (27), हर्षल गोहत्रे, कपिल तिडके (24) आणि एका 47 वर्षीय महिला अशा एकूण 7 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरी घटना बोरं आणि मध देण्याची बतावणी करून एका साडेबारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर जवळील शेतशिवारात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर या प्रकरणी आरोपी बबलू हरणे याला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community