Melghat Malnutrition: 150 दिवसांत तब्बल 110 चिमुकल्यांचा कुपोषणाने मृत्यू

गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीच्या मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या ५ महिन्यात तब्बल ११० चिमुकल्यांचा मेळघाटात मृत्यू झाला आहे. तर केवळ ऑगस्टमध्ये ३६ बालकं दगावल्याचे समोर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात दोन मातांसह ०-६ वर्ष वयोगटातील ७७ आणि ३३ उपजत अशा ११० बालकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच महिन्यात २ हजार ५२५ बाळांचा जन्म मेळघाटमध्ये झाला. त्यापैकी ३६ बाळांचा मृत्यू फक्त ऑगस्ट महिन्यात झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो सावधान! Video Call करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी)

दरम्यान, ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यातील १९ बालकांचा मृत्यू धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयाच झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवानी लहान मुलांना उपचार कुठे करायचे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. हा प्रश्न इतका गंभीर होत असताना राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना आखतंय, न्यायालय ताशेरे ओढतंय तरीही कुपोषित बालकांच्या मृत्यूची आकडेवारी कमी होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here